1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. sudhir muntantiwar

शिवसेनेचा बहिष्कार नाही, परवानगी मागितली होती : मुनगंटीवार

sudhir muntantiwar

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमधील तणाव समोर आला. यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही. त्यांनी अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली, जी मुख्यमंत्र्यांनी दिली, असं स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मुनगंटीवार म्हणाले की, “जीएसटीबाबत जसं सगळ्यांना विश्वासात घेतलं, तसंच आता कर्जमाफीसाठीही घेणार आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे. उद्धव ठाकरे परदेशात आहेत, ते आल्यावर त्यांचं मतही विचारात घेणार आहोत. याशिवाय शेवटच्या शेतकऱ्याचंही मत विचारात घेऊ ''असे त्यांनी सांगितले. 

पुढील लेख
गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात बदल नाही