गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (10:14 IST)

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर आश्रम शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनींनी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.  अनिता मनोहर भोये(12) असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. हिने आश्रम शाळेत सकाळी राहत्या घरासमोर असलेल्या लोखण्डी रॉड ला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हीसंपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.  
मिळालेल्या माहितीनुसार अनिताला शिंदे दिगरच्या आदिवासी आश्रम शाळेत तीच्या पालकांनी सोडले होते. कोरोनाच्या काळात घरात असल्यामुळे तिला शाळेत आवडत नसे. तिने मला घरी जायचे आहे. असे शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला घेऊन जावे असे सांगितल्यावर अनिताचे वडील तिला घेण्यासाठी सोमवारी येणार होते. पण त्यापूर्वीच तिने असे केले. 
अनिता ने आत्महत्या केल्याची सम्पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळतातच पालकांनी शाळेकडे धाव घेतली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना देखील कळविण्यात आले. पोलसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविला. नंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत आहे. या चिमुकलीने आत्महत्या का केली. अद्याप समजू शकले नाही.