‘कोविड सेंटर’ मध्ये रुग्णाची गळफास घेत आत्महत्या…!
कोरोना आजाराला कंटाळून कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केली आहे.दरम्यान ही धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली. गणेश करांडे (वय 35 वर्ष, रा.नेवासा खुद्द,ता. नेवासा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पंचनामा करून मृतदेहाचे नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नेवासा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मयत गणेश करांडे याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.