1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (07:24 IST)

वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यापासून तो तणावाखाली होता.याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आर्य मिलिंद क्षत्रिय (वय १९, रा. गोविंद हाईट्स, गोविंदनगर, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यातून तो ताणतणाव खाली असायचा. त्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गोविंद हाईट्समध्ये तो आईसोबत राहत होता. सोमवारी सकाळी आईला सांगून तो घराबाहेर गेला. त्यानंतर त्याने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत आर्यला मृत घोषित केले.