रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (15:40 IST)

पुन्हा एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

suicide
सांगली जिल्ह्यात एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला गेला आहे.
 
वेळेवर पगार न झाल्यानं त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 
 
भीमराव हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. भीमराव शिरढोण गावाचे रहिवाशी आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.