मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सेल्फी काढून तरुणाची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या

ठाणे- व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या किरकोळ वादावादीमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना ‍वासिंद व खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर घडली. विशाल रमेश खाडे असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे.
 
धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी त्याने पत्नीलाही आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर आणले होते. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅकवर उभे असताना विशालने गाडी येताच आपल्या पत्नीला ट्रॅकच्या बाहेर ढकळून दिले व स्वतः: आपली जीवनयात्रा संपवली.
 
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशाल याने आत्महत्येपूर्वी त्याने रेल्वे ट्रॅकवर आपली पत्नी वैष्णवीसोबत एक सेल्फी काढला.
 
त्या सेल्फी फोटोसोबत व्हॉट्सअॅपवर एक सुसाइड नोट टाईप करून आपले मित्र व नातेवाईक, भाऊ यांना पाठवली. या सुसाइड नोटमध्ये सचिन वेखंडे नाम व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडून व्हॉट्सअॅपवर येणार्‍या धमक्या, तसेच कॉल वरून नेहमी होणारी शिवीगाळ यामुळे आम्ही दोघे पती-पत्नी आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले आहे.
 
परंतू, प्रत्यक्षता रेल्वे ट्रॅकवर उभे असताना विशालने गाडी येताच आपली पत्नी वैष्णवी हिला ट्रॅकच्या बाहेर ढकळून दिले व स्वतः: आपली जीवनयात्रा संपवली. विशालला सहा महिन्यांची दुर्वा नामक एक मुलगी आहे. विशालच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक दत्ता बाभले तपास करीत आहे.