शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2024 (17:07 IST)

बीडच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा,चौघांवर गुन्हा दाखल

medicine
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा केला जात होता. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई येथे एक मोठे शासकीय रुग्णालय आहे. जवळपासचे लोक या ठिकाणी उपचारासाठी येतात.

प्रकरणाची माहिती मिळाल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शासकीय रुग्णालयाचा तपास करण्यात आला नंतर 5 डिसेम्बर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि नियम 1945 नुसार, अझिथ्रोमायसिन हे औषध बनावट असल्याचे आढळले. या औषधाची खरेदी महाराष्ट्र आणि गुजरातच्या चार पुरवठादारांकडून 50 लाखांहून अधिक टॅब्लेट खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक आणि अप्रामाणिकपणे एखाद्याला वस्तू देण्यास प्रवृत्त करणे, बनावट औषध तयार करणे, इतर औषधाच्या नावाने बनावट औषध विकणे किंवा तयार करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालयाचे डीन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे औषध बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. मात्र, ज्या रुग्णांना ही औषधे आतापर्यंत देण्यात आली आहेत त्यांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.
Edited By - Priya Dixit