सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा, अटींसह अंतरिम जामिनात वाढ
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आज माजी भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण देणाऱ्या आपल्या अंतरिम आदेशात वाढ केली आहे. पूजा खेडकर यांच्यावर 2022 च्या केन्द्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.
अतिरिक्त सालिसिटर जनरल एस.व्ही राजू यांच्या विनंती वरून न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटण्याच्या अआदेशाला खेडकर यांनी आव्हान दिले. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांना अधिक वेळ दिला.
तीन आठवड्यानंतर यादी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.जर पूजा खेडकर यांनीं तपास कार्यात सहकार्य केले तर तो पर्यंत अंतरिम संरक्षण चालू ठेवावे. या खटल्याचा सुनावणी दरम्यान खेडकर यांचे प्रतिनिधीत्व करणारे वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी खंडपीठाला सांगितले की, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले नाही आणि त्या सहकार्य करण्यासाठी तयार आहे.
Edited By - Priya Dixit