बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (08:33 IST)

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडतोय. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्स लक्ष वेधून घेत आहेत. अशावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’, असा हल्लाबोल विखे-पाटील यांनी केलाय.एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारला केला.