शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (09:25 IST)

सुप्रियाताई मीठाचा खडा टाकणे बरोबर नाही भाजपकडून प्रत्युत्तर

ashish shelar
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nanrendra Modi) यांच्या देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतून टीका केली जात आहे. त्यावर भाजपकडून आता प्रत्युत्तर दिले जात आहे. सुप्रिया सुळे यांनी सुरु केलेल्या या विषयावर भाजप नेते प्रविण दरेकरनंतर आशिष शेलार यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
 
माध्यमांशी बोलतांना शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सरकारी किंवा पक्षाच्या नव्हता. तो देवस्थानाने आयोजित केलेला कार्यक्रम होता. देवस्थानाच्या कार्यक्रमावर सुप्रियाताईंनी टीका करावी, हे बरोबर नाही. तरीही त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने अजित पवार यांना भाषण करायला सांगितले. परंतु त्यांनीच नकार दिला. खरंतर सुप्रियाताई प्रत्येक गोष्टीत राजकारण करुन मीठाचा खडा टाकणे बरोबर नाही. तुम्ही थोडी माहिती घेऊन वक्तव्य केले असते तर बरे झाले असते.
 
काय आहे प्रकार
 प्रोटोकॉल प्रमाणे उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या वतीने अजित पवार यांना भाषणासाठी संधी देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना भाषण करु दिलं नाही ही दडपशाही असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवारांना भाषणाला पंतप्रधान कार्यालयातुन नकार आला, हे मला वेदना देणारं आहे. महाराष्ट्र राज्याचा हा अपमान आमच्या उपमुख्यमंत्र्यांना भाषण न करू देणं हे धक्कादायक आहे." त्यानंतर आता काँग्रेसच्या सचिन सावंत यांनीही ट्विट केलं आहे.