गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (07:51 IST)

शपथविधी बेकायदेशीर : जयंत पाटील

Jayant Patil
मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांची शपथविधी ही बेकायदेशीर असून त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
 
रात्री १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. ९ जण म्हणजे पक्ष नव्हे, त्यामुळे या ९ जणांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षविरोधात कारवाई केल्याने या ९ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. पक्षाच्या अध्यक्षाला न सांगता केलेली ही कृती होती. यासंबंधित आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावे. या ९ जणांच्या विरोधातच ही कारवाई असेल. पक्षात असून त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.