शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (21:26 IST)

आणि जयंत पाटील म्हणाले, संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का?

Jayant Patil
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार भाजपात येणार असा दावा काही दिवसांपासून सातत्याने शिंदे गट करत होता. त्यातच  शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं. त्यावर आता स्वतः जंयत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले, संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलिटी (विश्वासार्हता) जरा जास्त असेल नाही का? त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी प्रतिक्रिया घेणं म्हणजे जरा जास्तच झालं. तसेच पाटील या प्रश्नावर हसू लागले.