ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं- जयंत पाटील
जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) समन्स पाठवलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी ( २२ मे ) हजर राहण्यास सांगितलेलं. त्यानुसार जयंत पाटील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. तब्बल ९ तासानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर आले. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली आहे.
ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होता. तुम्ही थांबलात तुमचे आभार. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडलं,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.
Edited By- Ratnadeep Ranshoor