1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (07:49 IST)

सगळे घाव झेलायला ताई (पंकजा मुंडे) आहे आणि मलाई खायला मी आहे- प्रीतम मुंडे

pritam munde
Twitter
सगळे घाव झेलायला ताई (पंकजा मुंडे) आहे आणि मलाई खायला मी आहे’, असे आपली मोठी बहिण म्हणजेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दलचे वक्तव्य भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांनी केले. नाशिक येथे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रीतम मुंडे बोलत होत्या. 
 
“आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे. पण हा नारा प्रत्यक्षपणे ४० वर्षे ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात एक व्यक्ती जगली. ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे आहेत. माझा जन्म त्यांच्या घरी झाला, त्यामुळे माझ्याइतकं भाग्यवान कुणी नाही, असं मला वाटतं. पण माझं मोठं भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे आणि त्याची सगळी मलाई खायला मी आहे”, असे प्रीतम मुंडे यांनी सांगितले.
 
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, “समोर बसलेले विद्यार्थी म्हणत असतील की, हे तुम्ही काय सांगत आहात. आयुष्यात संघर्ष करा, कष्ट करा, हे गोपीनाथ मुंडेंच्या घरी जन्मलेल्या मुलींनी व्यासपीठावर बसून सांगू नये, असं काहींना वाटत असेल. पण माझा येथे बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. आम्ही नशिबवान आहोत. कारण माझा किंवा राहुल कराडचा आमच्या घरी जन्म झाला. पण गोपीनाथ मुंडे कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्मले नव्हते किंवा विश्वनाथ कराड कुठल्या दिग्गज माणसाच्या घरी जन्मले नव्हते. त्यामुळे तुम्हाला राहुल कराड व्हायचंय की विश्वनाथ कराड व्हायचंय हा तुमचा निर्णय आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor