शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (10:27 IST)

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र बंद करू - नाना पटोले

"बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्ती दाखवत असून शेतकऱ्यांना चिरडणारं भाजपचं केंद्रातलं मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातलं योगी सरकार बरखास्त करा," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
 
लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी नाहीतर महाराष्ट्र बंद करू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिलाय. लखीमपूर खिरीमधल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं.प्रियांका गांधी यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेधही यावेळी करण्यात आला.