1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (08:42 IST)

रेल्वेची स्पीड कमी झाल्याचा फायदा घेत चॊरट्यांनी २ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरला

Taking advantage of the reduced speed of the train
कुर्डुवाडी  पनवेल- नांदेड (गाडी नंबर १७६१३)रेल्वेची गती कमी झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या बोगीच्या खिडकीतुन हात घालून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिना व इतर साहित्य असे एकूण २ लाख ८३ हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना गुरुवार दि. १० रोजी रात्री १०.२६, ते १०.३५ वा. दरम्यान ढवळस ता. माढा येथील रेल्वे स्थानकाच्या आऊटर सिग्नल जवळ घडली. याबाबत कुर्डुवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात शिल्पा कमल मोदी रा. देवी वार्ड, काळा मारुती मंदिर ता. पुसद जिल्हा यवतमाळ व अक्षय अनंत मोरे रा. १३८ प्रथम बंगलो सोसायटी पोलीस लाईन पाठीमागे वाकड पुणे. यांनी फिर्याद दाखल केली आहे.
 
फिर्यादी मोदी या पनवेल -नांदेड गाडी नं. १७६१३ या गाडीने बोगी नं. एस २ बर्थ नं ४१ या डब्यातून लोणावळा ते नांदेड खिडकीकडे डोके करुन झोपून प्रवास करत असताना गळ्यातील सोन्याचे चेनमधील पॆंडलसह अंदाजे रक्कम २ लाख पन्नास हजारांची सोन्याची चेन ओढून पळवून नेली. याच गाडीतील अक्षय मोरे हे चिंचवड ते पूर्णा बोगी नं एस १० बर्थ नं ७ वरुन प्रवास करत असताना डेल कंपनीच्या काळ्या रंगाच्या बॅगेतून इअरबॅंड ९०० रु,वायफाय डिव्हाइस २००० रु,अॅपल इअर बँड १२ हजार ५००,जेनेक्स कंपनीचा चष्मा ४५०० रुपये किमतीचा चष्मा अंदाजे एकूण ३३ हजार ९०० रूपयांचा ऐवज लंपास केला.दोघांचा मिळून एकूण २ लाख ८३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला.