शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (18:11 IST)

नागपूरमध्ये तालिबानी दहशतवादी?

नागपुरात 10 वर्षे बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या नूर मोहम्मद याचा अफगाणिस्तान मधील शस्त्रासह फोटो व्हायरल होत आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या नागरिकाला नागपूर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तान मध्ये परत पाठविले होते. मात्र, तो नूर मोहम्मद चं आहे का, याबाबत शंका आहे. 
 
नूर मोहम्मद हा अफगाणी नागरिक टुरिस्ट व्हीजा वर भारतात आला होता. मात्र, त्याचा व्हीजा संपल्यावरही तो बेकायदेशीर पणे नागपूरात वास्त्याव्याला होता. याची माहिती नागपूर पोलिसांना कळल्यावर दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.
 
त्यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. मात्र, त्याच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नसल्यानं किंवा त्याचा कुठल्याही बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभाग नसल्यानं त्याला पोलिसांनी परत अफगाणिस्तान मध्ये पाठवून दिले होते.
 
मात्र, आता त्याचा नागपुरातील आणि अफगाणिस्तान मध्ये शस्त्रासह असलेला फोटो व्हायरल झाला असला तरी नागपूर पोलीस आयांनी व्हायरल होत असलेला फोटो एकाच व्यक्तीचा नसल्याचं सांगितलंय. 
 
आम्ही नूर मोहम्मद याला अफगाणिस्तान मध्ये परत पाठवलंय. त्याचे नागपूरात काहीही अपराधी कृत्य असल्याचं पुरावे नाही. तिथं गेल्यावर तो काय करतोय याच्याशी आमचा संबंध नाही. मात्र, त्याच्या नागपुरातील लोकांशी काही संबंध असल्याचं तपासलं जाणार असल्याचं मात्र त्यांनी सांगितलं.