अकोला-वाशिम महामार्गावर मेडशी गावाजवळ कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; १५ जण जखमी
वाशिम जिल्ह्यातील मेडशी गावाजवळ टाटा मॅजिक आणि कार यांच्यात झालेल्या या भीषण धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु १५ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली असून आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
अकोला-वाशिम महामार्ग हा नेहमीच वर्दळीचा असतो. या मार्गावर वारंवार अपघात होतात, त्यामुळे वाहनचालकांनी वेग मर्यादा पाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: Legislative Council Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस