गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (16:55 IST)

खासगी क्लासला आलेल्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला, आरोपीला अटक

असं म्हणतात की गुरु हेच सर्वकाही असत. गुरु शिष्यच नातंच वेगळं असतं. गुरूमुळे एक विद्यार्थी घडतो. गुरूला महान म्हटले आहे. परंतु आजच्या काळात या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लातूरच्या शिवाजी नगर येथे. इथे एका शिक्षकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा असून घृणास्पद कार्य केले आहे. इथे एका शिक्षकाने खासगी क्लास ला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. किशोर मामडगे असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. सदर आरोपी शिवाजी नगर भागात इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत खासगी शिकवणी घेतो. 
दररोज प्रमाणे पीडित मुलगी 26 डिसेंबर ला क्लासला शिकवणी घेण्यासाठी आली असता आरोपी किशोरने तिच्या वर लैंगिक अत्याचार केले. मुलीने घडलेला प्रकार घरी गेल्यावर आईला सांगितला. आईने पीडित मुलीला घेऊन जाऊन आरोपी किशोर मामडगे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली .पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.