1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (12:02 IST)

मुख्याध्यापकासह शिक्षक दारु पिऊन शाळेत

Teacher with principal drinking alcohol in school
चंद्रपूर जिल्ह्यात जीवती तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी व पालकांनी मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर लगाम बसण्यासाठी त्यांचा व्हिडीओ काढून शिक्षण विभागाकडे पाठवल्याचा प्रकार घडला आहे. या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगली असून  या शाळेत मुख्याध्यापक समवेत अजून दोन शिक्षसक आहे. त्यापैकी मुख्याध्यापक आणि एक शिक्षक सतत मद्यधुंद अवस्थेत शाळेत येतात. सततचे त्यांचे वागणे बघून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांचे व्हिडीओ बनवले आणि शिक्षण विभागाला पाठविले.आणि शिक्षकांची तक्रार केली. 

हा सर्व प्रकार चंद्रपूर जिल्यातील जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मद्यधुंद शाळेत येण्याच्या अवस्थेवर नाराजगी व्यक्त करून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांना मद्यधुंद अवस्थेत शाळेत येताना पाहून शाळेत आणि गावात चांगलीच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार एका विद्यार्थ्याने आणि त्याच्या पालकांनी मोबाईल मध्ये कैद केला आणि शिक्षण विभागाला पाठवला. 

शिक्षकांना शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, बिडीचे बंडल आणि खर्रा घेऊन येण्याचा व्हिडीओ काढला आहे. हा व्हिडीओ शिक्षण विभागाला पाठवून पालकांनी संताप व्यक्त करत मुख्याध्यापक आणि शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मद्यपी शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने संतप्त पालकांना दिले आहे.
 
 Edited by - Priya Dixit