गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (21:04 IST)

मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावास

jail
सिंधुदुर्गनगरी : मूकबधिर मुलीला उचलून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मंगेश दशरथ परब (रा . हुमरमळा) याला जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावास व 2000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याची संपूर्ण सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भारुका यांच्या न्यायालयात होऊन सदर खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आठ साक्षीदार तपासले. सदर खटल्यात मूकबधिर साक्षीदाराचा पुरावा गजानन तोडकरी यांनी कौशल्याने रेकॉर्डवर आणलेला होता. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे देऊन युक्तीवाद केला होता. न्यायालयाने आरोपी मंगेश परब याला दोषी धरून भा. दं. वि. कलम 376(1) अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास व 1000/- दंड व कलम 376(2)(L) अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास व 1000 दंड अशी शिक्षा सुनावली.सदर गुन्ह्याचा तपास तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल पाटील यांनी केला होता. सदर केसच्या सुनावणीवेळी साक्षीदारांना उपस्थित ठेवण्याकरता तसेच तेलंगणा राज्यातून पिडीतेला आणण्याकरिता पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर व सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील वगैरे टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.