शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (15:03 IST)

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने नाहीच

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणं अशक्य असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु आहे. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.\ 17 नंबरचा फॉर्म भरुन 12 वी आणि 10 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 12 जानेवारी पर्यत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :
– दहावी :- http://form17.mh-ssc.ac.in
– बारावी :- http://form17.mh-hsc.ac.in