मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 17 मार्च 2023 (12:25 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

accident
मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी आढे गावाच्या हद्दीत 82 किलोमीटर  जवळ कारची मालवाहू ट्रकला जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. 
मुंबईहून पुण्याकडे निघालेली कारची मालवाहू ट्रक ला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की अर्धी कार मागील बाजूने ट्रकच्या खाली गेली. चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळतातच महामार्ग पोलीस आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणाने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहनातून तिघांना बाहेर काढले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 
 
Edited By- Priya Dixit