शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2023 (09:44 IST)

सांगली : डॉक्टरचा श्वानावर अघोरी उपचार, श्वानाचे दोन्ही कान मुळातूनच कापले

सांगली येथील राजपूत कॉलनी संजय नगर येथील सुनील कोल्हे या माणसाच्या डॉक्टराने चक्क एका तीन महिन्यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळातूनच कापले. सदरच्या घटनेबाबत संजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेबाबत ओंकार सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यासाठी सुनील हवालदार, कौस्तुभ पोळ यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास अधिकारी असिफ संदी, संजयनगर पोलीस करत आहेत.
 
या प्रकरणात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०- कलम ११,३८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१- कलम ११९, श्वान प्रजनन आणि विपणन नियम,२०१७ अंतर्गत कान कापणी आणि शेपटी डॉकिंग स्पष्टपणे प्रतिबंधित आणि प्रतिबंधित असून, भारतीय दंड संहिता १८६०- कलम ४२९ आदी कलमे लावण्यात आली आहेत.
 
डॉबरमॅन तसेच इतर जातीच्या श्वानामध्ये हा अघोरी प्रकार सर्वत्र केला जातो. तो अत्यंत वेदनादायक आणि अनैसर्गिक आहे. सुंदर दिसण्यासाठी आणि स्पर्धेत नंबर मिळण्याच्या हेतूने श्वानाना त्यांचे नैसर्गिक अवयव गमवावे लागत आहेत. पुढील काळामध्ये त्यांना अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास कारवाई होऊ शकते, असा इशारा एनिमल राहतचे प्राणी निरीक्षक कौस्तुभ पोळ यांनी दिला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor