मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांनाही एटीएसनं ताब्यात घेतले आहे.त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीनं 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. देशात काही घातपाती कारवाया करायच्या आहेत म्हणून हे सर्व काम करत होते. अशी महिती ए टी एस ला मिळताच कारवाई केली आहे.