बुधवार, 12 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (15:51 IST)

ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार!आदित्य ठाकरेंनी केले मोठे विधान

uddhav and raj thackeray
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना यूबीटी आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षांचे कार्यकर्त्ये वारंवार दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
तसे आवाहन करत आहे. आगामी महानगरपालिका संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना शिवसेना यूबीटीचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, कोणत्याही अटी शिवाय दोन्ही भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे.   
काही मुद्दे समजण्यापलीकडील आहे. दोघे भाऊ 20 वर्षांपूर्वी वेगळे झाले. 5-10 वर्षांपूर्वी उद्धव यांनी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी हात पुढे केला होता. पण हे शक्य होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.आमचा लढा गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर भेटतो आणि मागण्या माध्यमांसमोर ठेवतो. रात्रीच्या वेळी भेटायला जात नाही. त्यांनी असे म्हणत राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.