रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2024 (14:45 IST)

ठाणे : 3 तरुणांनी 18 वर्षांच्या मुलीचा केला विनयभंग, नंतर खोटे लग्न लावून फोटो व्हायरल केले

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण मध्ये तीन तरुणांनी एका 18 वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर या तिघांनी खोटे फोटो तयार करून खोटे लग्नाचे फोटो वायरल केले. ज्यामुळे तरुणीला मानिसक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
 
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण मध्ये तीन तरुणांनी एका 18 वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर या तिघांनी खोटे फोटो तयार करून खोटे लग्नाचे फोटो वायरल केले. ज्यामुळे तरुणीला मानिसक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनी या तिघ आरोपीनीविरुद्ध तक्रार दाखल करीत चौकशी सुरु केली आहे.
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, पीडितेच्या तक्ररीनंतर आरोपी महबूब शेख, गगन कुंडू आणि सोनी कुंडू यांनी तरुणीचा विनयभंग केला होता. तसेच तरुणीने सांगितले की, यातील एका आरोपीने तिला वाईट स्पर्श केला. तर बाकी दोघांनी चुकीचे फोटो तयार करीत खोटे लग्नाचे फोटो वायरल केले.  
 
अधिकारींनी सांगितले की या तिघांनी खोट्या लग्नाचे फोटो वायरल केले, ज्यामुळे टाय तरुणीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. अधिकारींनी सांगितले की, आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार लैंगिक छळ, गुन्हेगारी धमकी आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.