मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (09:04 IST)

घरघुती भांडण विकोपाला प्रचाराचा नारळ घातला पत्नीच्या डोक्यात

thane mahapalika
महापलिका निवडणूक असलेल्या ठाण्यामध्ये प्रचाराचा नारळ पत्नीच्या डोक्यात घातल्याचा प्रकार घडला आहे.   शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील यांनी पत्नीला प्रचाराचा नारळ भिरकावून मारला आहे . पत्नी संगीता पाटील या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. तर विशेष म्हणजे पती माणिक पाटील यावर्षीचे शिवसेना उमेदवार आहेत.
 
ठाण्याच्या श्रीनगर यां भागातील  प्रभाग 16 मधील शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम होता. या करिता नारळ फोडण्यासाठी प्रभागातील उमेदवार माणिक पाटील, गुरुमितसिंग स्यान आणि डॉ जितेंद्र वाघ उपस्थित होते. तर पाटील यांच्या पत्नी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटील घटनास्थळी आल्या होत्या . यावेळी आधीपासून आय दोघात घरघुती मोठे वाद आहेत. तर तेव्हा पाटील यांनी इतकी वर्ष कुठे होता असा पती प्रश्न करताच झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर माणिक पाटील यांनी पत्नी संगीता यांच्यावर प्रचाराचा नारळ भिरकावून जखमी केले आहे. पत्नी संगीता पाटील आणि तिचे समर्थक यांनी श्रीनगर पोलीस ठाणे तक्रारीसाठी धाव घेतली आहे. या दोघांचे भांडण पूर्ण परिसराला माहित आहेत.