1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (13:19 IST)

Thane: एका बकऱ्यावरून दोन गटात जोरदार राडा, वातावरण तापलं

ठाण्यातील मीरारोड वरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोड पूर्व येथील जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्स मध्ये एका बकऱ्यावरून जोरदार राडा झाला. मीरारोडच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्स नावाच्या सोसायटीमध्ये मोहसीन शेख नावाचा इसम बकरा घेऊन शिरला. तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला सोसायटीत बकरा नेऊ नको असं सांगितल्यावर त्याने बाचाबाची केली. हे पाहून सोसायटीमधील सर्व रहिवाशी देखील खाली उतरून आले आणि त्यांनी देखील विरोध केला. या मुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.

रहिवाशांनी परिसरात हनुमान चालिसाचं  पठण केलं. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवाशी विरोधात असल्यामुळे वाद अधिकच वाढला. पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाला  बोलावले. या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit