गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (20:46 IST)

शिर्डीजवळील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना नाशिकरोड पोलिसांनी केले सिनेस्टाइल जेरबंद

jail
नाशिकरोड  :- शिर्डीजवळ सावळीविहीर गावात जवाई आणि त्याच्या भावाने एकाच कुटुंबातील पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली. हत्या करून फरार झालेल्या दोघांना नाशिकरोड पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले.
 
कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याने नगर जिल्ह्यासह शिर्डी हादरले आहे. शिर्डीजवळील सावळीविहीर गावात राहणाऱ्या संशयित सुरेश निकम याचा 9वर्षी पूर्वी विवाह झाला होता. आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळींशी मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. पत्नी ने यामुळे शिर्डी, नगर पोलिसात पती आणि त्याच्या कुटूंबिया विरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या.काही दिवसांपूर्वी पत्नी च्या कुटूंबियांनी पती च्या कुटूंबियाना त्याच्या घरी जाऊन मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून काल
 
मध्यरात्री हे हत्याकांड घडले. रागाच्या भरात आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम (वय 32) व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम (वय 26) राहणार संगमनेर खुर्द, नगर यांनी घरात घुसून वार केले. त्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी आहेत.
 
जखमींना नातेवाईकांनी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. गुन्हा घडल्यानंतर नगर चे स्थनिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी नाशिकरोड पोलिसांना कळवले की गुन्हा करून निकम बंधू नाशिक च्या दिशेने पळून गेले आहे.
 
साह्ययक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामदास विंचू,गुन्हे शोध पथकाचे सुभाष घेगडमल, संदीप पवार, गोकुळ कासार, कल्पेश जाधव, भाऊसाहेब चत्तर, ताजकुमार लोणारे आदींनी पहाटे 3वाजेच्या सुमारास शिंदे टोलनाका येथे सापळा रचला.वाहनांची तपासणी सुरू असताना सिन्नर च्या एक नंबर नसलेली काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल येतांना दिसली. सपोनि शेळके आणि पथकांनी त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी न थांबता पळून जाऊ लागले. पथकांनी त्याचा सिने स्टाईल पाठलाग करून त्याना ताब्यात घेतले.
 
दोघेही तिहेरी हत्याकांड करून नाशिक मार्गे बाहेर च्या राज्यात जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. सपोनि शेळके आणि पथकाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांनी अभिनंदन केले.