गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (07:45 IST)

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या

suicide
Accused in the Kopardi murder case संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याचा मृतदेह आढळून आला.
 
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणात पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक केली होती. जितेंद शिंदे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. पुण्यातील येरवडा कारागृहात तो शिक्षा भोगत होता. आज पहाटे कारागृहातील सुरक्षा क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 14 मध्ये त्याने टॉवेल फाडून दरवाजावरील पट्टीला गळफास घेतला. ही बाब कामावर असणाऱ्या करागृह कर्मचारी निलेश कांबळे यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने इतर सहकाऱ्यांना बोलावून त्याला खाली उतरवले. परंतु, तोपर्यंत त्याचा जीव गेला होता.
 
घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहचले. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.