रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 सप्टेंबर 2023 (12:19 IST)

Pune :कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या

suicide
Pune :कोपर्डी अत्याचाराचा मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने कारागृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या येरवडा कारागृहात घडली आहे. आरोपी जितेंद्र याने कारागृहात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. मयत जितेंद्र हा कोपर्डी बलात्काराचा प्रमुख आरोपी होता. येरवड्याच्या कारागृहात शिक्षा भोगत होता. 
 
आज सकाळी पहाटे पोलीस गस्तीवर गेले असता पोलिसांना त्याचा मृतदेह कारागृहात बराक मध्ये गळफास घेतलेला आढळला. 
 
आरोपी जितेंद्र चे नाव पप्पू बाबुलाल शिंदे(31) हा घटनेचा मुख्य आरोपी असून त्याचे आईवडील मजुरी करतात. आरोपी जितेंद्र हा वीटभट्टीवर काम करायचा. त्याने घटनेच्या पूर्वी नवीन दुचाकी खरेदी केली.पीडितेच्या भावाने त्याला घटनास्थळी पहिले असताना तो पकडला गेला. त्याच्यावर बलात्काराचा आरोप असून तो कोपर्डी बलात्काराचा मुख्य आरोपी असून येवड्याच्या कारागृहात होता. आज त्याने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. 





Edited by - Priya Dixit