Nashik Accident : बस आणि कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू
Nashik : सध्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नाशिक पेठ मार्गावर करंजाळी जवळ बस आणि कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नाशिक-पेठ धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी करंजाळी जवळ गुजरातहून नाशिकच्या इगतपुरी परिसरात कारने चौघे फिरायला आले असता पेठ जवळ करंजाळी येथे वळणावर एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
गुजरातच्या बलसाड येथील चोघे मित्र कारने नाशिकच्या इगतपुरीला फिरायला गेले होते परत बलसाडला येत असताना पेठ धर्मपुरी मार्गावरून जाताना त्यांचा वाहनाचा अपघात झाला.
एसटी महामंडळाची बस पेठ आगाराची असून पेठहून पुण्याला जात असताना नाशिकहून गुजरातच्या दिशेने जाणारी कार करंजाळी गावाजवळ वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेन मध्ये जाऊन एसटीबसला समोरून धडकली
या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे.
Edited by - Priya Dixit