1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (18:30 IST)

Kolhapur : सोशल मीडियावर स्टेट्स ठेवत अल्पवयीन जोडप्याची आत्महत्या

suicide
कोल्हापुरातून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत एका अल्पवयीन जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरोली येथे घडली आहे. 
या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं.पण यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे त्यांनी आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेत नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.  त्यांनी त्यांच्या मोबाईल वर स्टेटस लावले होते. ज्यांच्यासोबत प्रेम करता त्याच्यासोबत मरण्याची तयारी ठेवा, प्रेम करताना जाती धर्म बघू नका, अन्यथा प्रेम करू नका. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन जोडप्यांपैकी तरुण मुस्लिम तर तरुणी हिंदू होती. या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांचे प्रेम संबंध गेल्या दोन वर्षांपासून होते. त्यांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध असून त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. मात्र पुढे आपले एकमेकांशी लग्न होणार नाही. त्यामुळे शुक्रवारी तरुणी घरातून बाहेर पडली आणि रात्री प्रियकराच्या घरी गेली तिथेच त्यांनी नायलॉनच्या दोरीने लोखण्डी पाईप ला गळफास लावून आपले आयुष्य संपविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 
 


Edited by - Priya Dixit