गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (21:29 IST)

बहिणीने तक्रार करताच शरद पवारांनी दिला कानमंत्र, म्हणाले, कमी बोल म्हणजे…

sharad panwar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दसरा चौकातील काल संध्याकाळच्या सभेनंतर आज पुन्हा शरद पवार यांनी भेटीगाठी घेण्यास सकाळपासून सुरुवात केली. आज दुपारी त्यांनी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी त्यांची बहिण सरोज पाटील यांची रूग्णालायात जाऊन भेट घेतली. सरोज पाटील म्हणजेच दिवंगत प्रा.एन.डी.पाटील यांच्या त्या पत्नी होत.सरोज पाटील या सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांनी थेट रूग्णालय गाढलं.यावेळी शरद पवारांनी बहिणीला कानमंत्र दिला.
 
सरोज पाटील यांची तब्येत खालवल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवार यांनी रूग्णालयात जाऊन सरोज पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यात गप्पा रंगल्या. या गप्पा सुरु असतानाच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर शरद पवारांच्या भेटीला आले.

यावेळी सरोज पाटील यांनी डॉक्टरांची तक्रार शरद पवार यांच्याकडे केली. डॉक्टर माझ्याकडून पैसे घेत नाहीत. त्यामुळे तू त्यांना रागव असं त्या म्हणाल्या. त्यावर शरद पवार म्हणाले की, तू कमी बोल म्हणजे तुझी तब्बेत चांगली राहिल. बहिणीला कानमंत्र देताच तिथे असलेल्या डॉक्टरांमध्ये हशा पिकला.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor