गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (21:20 IST)

कलादिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन, एन डी स्टुडिओमध्ये अखेरचा निरोप

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन झाले आहेत. कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबीय मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि स्थानिक उपस्थित होते. स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशी इच्छा नितीन देसाई यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांना तिथेच अखेरचा निरोप देण्यात आला.
 
नितीन देसाई यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलीने खांदा दिला, हे दृश्य पाहून उपस्थिताना अश्रू अनावर झाले. नितीन देसाईंच्या अंत्यदर्शनासाठी बॉलीवूड अभिनेता आमिर खान, मधुर भांडारकर, दिग्दर्शक रवी जाधव, मराठी अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री मानसी नाईक आले होते. कर्जतमधील एन डी स्टुडिओत नितीन देसाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
दरम्यान, नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. गळफास लावून त्यांनी जीवन संपवलं. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जेजे रुग्णालयात झाले. नितीन देसाई यांची मुलं परदेशात असल्याने ते आल्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानुसार आज सायंकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Edited By - Ratnadeep Ranshoor