गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (09:58 IST)

बहराइच : लग्न मंडपातून निघाली नवरदेवाची अंत्ययात्रा

उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यात जरवळ रोडच्या अटका गावातील एका लग्न मंडपातून नवरदेवाच्या वरात ऐवजी नवरदेवाची अंत्ययात्रा निघण्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाला. राजकमल असे या मयत नवरदेवाचे नाव आहे. 
 
 उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यात अटका गावातील रामलाल यांच्या घरात त्यांच्या मुलाचे लग्न होते. घरात आनंदाचे वातावरण होते. वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होत. वरात निघण्यासाठी नवरदेव राजकमल तयार होत असताना अचानक त्याची प्रकृती ढासळली.
 
त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. ज्या घरात सनई चौघड्यांचा आवाज येत होता. आता मात्र त्या घरात रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या घरातून नवरदेव राजकमलची ची वरात निघणार होती. त्या घरातून त्याची अंत्ययात्रा निघाली. घटनेची माहिती मिळतातच नवरी कडील मंडळी राजकमलच्या घरी पोंहोचले. ज्या घरात आनंद पसरले होते त्या घरात शोकाकुल वातावरण होते. 
 
लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांना राजकमलच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते. त्या मुलाचे पार्थिव पाहून त्यांनी हंबरडा फोडला. घरात आनंदाच्या वातावरणात राजकमलच्या मृत्यूने विरजण पडले. 
 
Edited by - Priya Dixit