गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (20:50 IST)

मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताच्या घरासमोर आत्महत्या केलेल्या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार

नाशिकरोड – मुलीचे डोळ्यासमोर अपहरण झाल्याने हताश झालेल्या दांपत्याने रेल्वे खाली आत्महत्या केली. मात्र ज्याने मुलीचे अपहरण केले त्याच्या घरासमोर मयत दांपत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने इगतपुरी, सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, काल दुपारी निवृत्ती किसन खातळे पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे व मुलगी असे भरविर गावाकडे जात असताना घोटी हायवे जवळील वाजे पेट्रोल पंप समोर समाधान सोमनाथ झनकर व इतर साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवून आई बापा समोर मुलीला गाडीत बसवून पळवून नेले. तरुण मुलीचे डोळ्यासमोर अपहरण झाल्याने खातळे दांपत्याने भगूर येथील नूतन शाळे मागे गोदान एक्स्प्रेस समोर येऊन आपले जीवन संपवले. नाशिकरोड लोहमार्ग पोलिसात आकस्मिक तर मुलीच्या मामा दिगंबर भीमा शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांत झनकर व त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी भरविर येथील गांवकरी व नातेवाईक यांनी खातळे दांपत्याचे मृतदेह ताब्यात घेऊन झनकर याच्या घरासमोर त्यांच्या वर अंत्यसंस्कार केले. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor