रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (20:27 IST)

चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्याचा व्हिडीओ व्हायरल, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

दोन दिवसांपासून समाज माध्यमावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्यात येत आहे. हा व्हिडीओ आधी उत्तर प्रदेशमधील असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांनी हा व्हिडीओ महाराष्ट्रातील इगतपुरी  तालुक्यातील असल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील खंबाळे फाटा परिसरातील हा व्हिडीओ आहे. त्यामुळे घोटी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांचे निर्दयी, अमानवीय पद्धतीने हाल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
एका चालत्या ट्रकवरून बकऱ्या रस्त्यावर फेकतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत चालत्या ट्रकमधून एक युवक रस्त्यावर बकऱ्या टाकत असल्याचे दिसत आहे. साधारण पाचशे मीटर अंतरापर्यत हा प्रकार सुरु असल्याचे दिसते. तर या ट्रकच्या बाजूलाच एका कार जात असताना दिसत आहे. बकऱ्या रस्त्यावर टाकल्यानंतर हा युवक या चारचाकीत ट्रकमधून उतरत आहे. याच कारच्या पाठीमागून पुन्हा एक कार जात असताना या कारमधील प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला आहे.
 
दरम्यान घोटी पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेत  कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओ कधीचा आहे, कोणाचा आहे? बकऱ्या रस्त्यावर का फेकत होते? या बद्दल तपास सुरू केला आहे. 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor