गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (10:37 IST)

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल, आज होणार सुनावणी

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेमध्ये दोन लहान मुलींच्या लैंगिक छळाच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या पोलीस कोठडीत स्थानिक न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत वाढ केली. तसेच आरोपीला कडक बंदोबस्तात ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.
 
दोन बालवाडीतील मुलींच्या कथित लैंगिक शोषणाप्रकरणी झालेल्या प्रचंड विरोधानंतर बुधवारी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी 72 जणांना अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या निदर्शनादरम्यान रेल्वे स्थानक आणि बदलापूरच्या इतर भागांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये 17 शहर पोलिस आणि सुमारे आठ रेल्वे पोलिस जखमी झाले, असे त्यांनी सांगितले.