शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (15:46 IST)

मुलाकडूनच सावत्र आईचा निर्घृण खून

सांगलीतील कवठेमहांकाळ तालूक्याजवळील हरोली येथील एका मुलाकडूनच सावत्र आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमोल संभाजी सुर्वे असे खून केलेल्या तरुणाचे नाव आहे.
 
अधिक माहितीनुसार, नंदा संभाजी सुर्वे (वय ५०) असे खून झालेल्‍या महिलेचे नाव असून, बुधवारी अमोल घरी आला. त्‍याने नंदा सुर्वे यांना शिवीगाळ केली. कुऱ्हाडीने त्‍यांच्‍या कपाळ, तोंडावर आणि डाव्या गालावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्‍या नंदा यांचा जागी मृत्यू झाला. दरम्यान, नंदा या आपल्‍या नावावर बँकेमध्ये २ लाख रुपये ठेवण्याची मागणी करत होत्‍या. तर या मुलाने हाच राग मनात धरुन मुलाने ही हत्या केली आहे. अशी तक्रार वडील संभाजी बाबू सुर्वे यांनी कवठेमहांकाळ पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. तर पोलिसांनी संशयित अमोल सुर्वे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.