संबंधित माहिती
- बहराइच : लग्न मंडपातून निघाली नवरदेवाची अंत्ययात्रा
- लग्नात नवरदेवाने मोटारसायकलची मागणी केल्यावर सासऱ्याने चप्पलेने मारहाण केली
- लग्न जोक - नवरदेव आणि देव
- लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येतोय,मोठी घटना घडेल, पोलिस नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलने खळबळ
- आरएसएस आपली शताब्दी का साजरी करणार नाही, असे मोहन भागवत यांनी सांगितले
वऱ्हाड घेऊन जाणारी बस पेटली
मुंबई- पुणे मार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसने पेट घेतला. या मध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे. बस मध्ये 42 प्रवाशी होते.
सदर घटना रविवारी 21 एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास खोपोली जवळ घडली.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. बस रायगडच्या खोपोली जवळ आली असता बस मध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला. प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बसमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला. नंतर बस पूर्णपणे जून खाक झाली.
घटनेची माहिती मिळतातच महामार्ग पोलीस, अग्निशमनदल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था डेल्टा फोर्सने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर दोन तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले. या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती.
Edited By- Priya Dixit
पुढील लेख
