बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (22:23 IST)

सीईटी परीक्षा 9 आणि 10 ऑक्टोबरला होणार

राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता उदय सामंत यांनी या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. नव्या वेळेनुसार  परीक्षा आता 9 आणि 10 ऑक्टोबरला पार पडणार आहे.  
 
एकूण 27 ते 30 हजार विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आली नव्हती. राज्यातील अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर राहता आले नव्हते. "परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये", असं म्हणत सामंतांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला.