1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (10:52 IST)

मुख्यमंत्र्यांची भन्नाट योजना! गंभीर आजारासाठी मिळणार अनुदान

eknath shinde
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी विविध उपाय योजना राबविल्या आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर वैद्यकीय मदत मिळणार. या योजनेत रुग्णाला अर्थसहाय्य दिले जाते .महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार. या योजने अंतर्गत गेल्या दीड वर्षात राज्यातील अनेक गरजूंना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी द्वारे सहायता देण्यात आली आहे. 

या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला कॉल केल्यावर एक मेसेज येतो. त्यात वैद्यकीय मदतीसाठी कोणती कागदपत्रे लागणार आणि मदत किती मिळणार, या अंतर्गत येणाऱ्या आजारांची यादी देखील मोबाईलवर येते. अर्ज केल्यावर काही दिवसांतच रुग्णाला अर्थ साहाय्य पुरविली जाते.  मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार 25 हजार ते दोन लाखांपर्यंत रुग्णांना उपचारासाठी मदत केली जाते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतील रुग्णालयांची माहिती cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेत स्थळांवर मिळेल. 
 
 
Edited by - Priya Dixit