1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (13:34 IST)

अधिवेशन होणारचं ; चंद्रकातदादांना उत्तर देणारंच

baba saheb thorat
करोनाची सबब पुढे करुन हे सरकार अधिवेशन घेणार नाही या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटिल यांच्या आरोपाला उत्तर देताना अधिवेशन होणारंच असे सांगत विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देऊ, असे प्रत्तुत्तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
 
ईगतपुरीच्या एक दिवसीय दौर्‍यावर आले असता थोरात पत्रकारांशी बोलत होते. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही तसेच सुनील केदार आणि नाना पटोले यांच्या अंतर्गतवादामुळे काँग्रेसचा पराभव झाला अशी टीका आशिष देशमुखांनी केली. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आरोप प्रत्यारोपांपेक्षा आत्मचिंतन महत्वाचे आहे. त्या ठिकाणी पक्षाला काही अडचणी निर्माण झाल्या हे त्यांनी मान्य केले.राहुल गांधी यांच्या सभेबाबत बोलताना सांगितले की कोरोनाचे संकट अजून संपले नाही. काळजी आपण घेतो आहोत. असे वाटत होते की महिन्याच्या अखेरपर्यंत वातावरण निवळेल. बीएमसीने परवानगी नाकारली तर दुसरा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.