शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (15:53 IST)

देशात नेहमी चांगल्या गोष्टीला विरोध करण्यात येतो : चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेतले असल्याची घोषणा केली आहे. यावर काही भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली तर कोणी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. या देशात नेहमी चांगल्या गोष्टीला विरोध करण्यात येतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कायदा रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगला दर मिळण्यामुळे आनंद मिळणार होता सुख मिळणार होते. मात्र ते पर्याय नाही म्हणून कायदे मागे घ्यावे लागत आहेत. अनेक महिने आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य आहेत. परंतु एक विशिष्ट या कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा फटकारले होते की, या कायद्यांवर स्थगिती आहे तर आंदोलन का करता? तुम्ही इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करु शकत नाहीत. असे सर्वोच्च न्यायालायने म्हटलं असताना शेतकरी मागे हटले नाही त्यामुळे अतिशय दुःखाने मोदींनी हा निर्णय मागे घेतला आहे.
शेतकऱ्यांना मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी यामध्ये होती. यामध्ये काय चुकीचे आहे. शेतकऱ्यांना समितीने चांगला भाव दिला तर तो बाजारामध्ये विकू शकत होता. पण बाजाराच्या बाहेर विकण्यासाठी जी परवानगी होती ती मिळणार होती. यामुळे दर आटोक्यात येणार होते. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्याची काय गरज नव्हती असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.