अभिनेते विक्रम गोखले यांचे शिवसेना-भाजपा युतीवर भाष्य
अभिनेते विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजपा युतीवरही पुन्हा भाष्य केलं आहे. “करोडो लोकांनी विश्वास ठेवला, निवडून दिले, निवडणूक झाली. मात्र त्यानंतर जे झाले ते इतकं अनपेक्षित होतं, धक्कादायक होतं ज्याला आपला विश्वास घात झाल्यास सारखं वाटलं, हा विश्वास घात नाही तर काय आहे? दोन्ही पक्षांच्या चुका आहेत. अशाप्रकारे विक्रम गोखलेंनी भाजपा शिवसेना युतीवर भाष्य केले. यावरून त्यांनी भाजपा शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली.
“खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध असून मी धिक्कार करतो. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. स्युडो सेक्युलर लोकांना वाटतं की, मी ठराविक लोकांच्या बाजूनं बोलतो. पण मी विद्यमान सरकारच्या विरोधातही जाहीरपणे बोलतो,” असं गोखले म्हणाले.
“दोन चांगले कार्य करणारे पक्ष एकत्र येऊ इच्छितात. त्यावर मी विश्वास ठेवला, करोडो लोकांनी विश्वास ठेवला, निवडून दिले, निवडणूक झाली. मात्र त्यानंतर जे झाले ते इतकं अनपेक्षित होतं, धक्कादायक होतं ज्या नेत्याला आपल्या विश्वास घात झाल्यास साखरं वाटलं, हा विश्वास घात नाही तर काय आहे? दोन्ही पक्षांच्या चुका आहेत…दोन्हीही. दोन्ही पक्ष माझे मित्र आहेत. मात्र दोन्ही पक्षांच्या चुका झाल्या आहेत. जबाबदार अशा या पक्षांतील नेत्यांशी मी बोललो आहे. त्यामुळे मी म्हणतो अजूनही म्हणतो की, अजूनही वेळ गेलेली नाही. फार कड्यावरती आपला देश उभा आहे. अशा माझी खात्री आहे. शंका नाही. १९६२ सालचा भारत आत्ता २०२१ मध्ये राहिलेला नाही. हे जेव्हा जगाला कळते आणि आपल्या शत्रूंनाही कळते तेव्हा ते थांबतात.” असंही विक्रम गोखले म्हणाले.