शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (10:49 IST)

मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करूया - अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी काहीतरी तुफानी करूयात, मी पुन्हा येतेय, असं म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे त्या आता कोणती खळबळ माजवणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान, अमृता यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्यांचं दिसून येतं. काहींच्या मते अमृता फडणवीस या नवं गाणं घेऊन येणार आहेत.
या ट्विटमुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्याचं नेमकं उत्तर अमृता फडणवीस याच देऊ शकतील.