शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (08:29 IST)

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

लवकरच मुंबई महानगरपालिकेची  निवडणुक जाहीर होणार आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीमध्ये (NCP) माजी महापौरांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
 
निर्मला सामंत यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला येणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीत  अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.