रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (08:26 IST)

प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाणार ?

राज्यात विधानसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.  या पार्श्वभुमीवर काॅग्रसने  आपली उमेदवारी जाहीर केली. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, काॅग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतलीय.
 
विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाव्यात यासाठी काँग्रेसकडून धडपड सुरू आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ आता मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे.
 
बाळासाहेब थोरात म्हणाले, शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलीय. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशी एखादी दु:खद घटना घडली तर त्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध दिला जातो. याबाबत फडणवीस आणि पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करु. असं ते म्हणाले. तसेच, नाना पटोले आणि थोरात यांनी फडणवीसांची वेगळी भेट घेतली. त्याबाबत ते म्हणाले, नाना पटोले त्यांच्या घरी शुभकार्य आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी ते फडणवीसांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांना तुम्हीही विनंती करा असं सांगितल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.